गडचिरोलीविदर्भ

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कार्यालयात पदवीधर मतदार नोंदणी कक्ष स्थापन

अधिकाधिक पदवीधरांनी मतदार नोंदणी करावी – आ. अभिजीत वंजारी यांचे आवाहन

गडचिरोली : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अधिकाधिक पदवीधर मतदारांची नोंदणी करण्यासाठी जिल्हा काँग्रेस कार्यालयात विशेष मतदार नोंदणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

आमदार अभिजीत वंजारी, आमदार रामदास मसराम आणि जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या हस्ते या कक्षाचे लोकार्पण करण्यात आले. पदवीधरांची मतदार नोंदणी सुलभ व्हावी आणि नोंदणी करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करता यावे, यासाठी हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

यावेळी बोलताना आमदार अभिजीत वंजारी यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पदवीधरांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, या कक्षाच्या माध्यमातून पदवीधरांना नोंदणीसाठी आवश्यक मार्गदर्शन आणि मदत मिळेल.

या लोकार्पण सोहळ्याला माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, युवक काँग्रेस राष्ट्रीय सचिव अ‍ॅड. विश्वजीत कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, सिनेट सदस्य अजय लोंढे यांच्यासह आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, नंदू वाईलकर, वामनराव सावसाकडे, नेताजी गावतुरे, शंकरराव सालोटकर, अब्दुल पंजवानी, दत्तात्र्यय खरवडे, विनोद लेनगुरे, नंदू नरोटे, अनिल कोठारे, मुस्ताक हकीम, रुपेश टिकले, दिवाकर निसार, ढिवरु मेश्राम, चोखाची भांडेकर, धनपाल मिसार, डॉ शशिकांत गेडाम, काशिनाथ भडके, समीर ताजने, श्रीनिवास ताडपल्लीवार, योगेंद्र झंजाळ, जितेंद्र मुनघाटे, लालाजी सातपुते, आनंदराव पिपरे, बंडू पोहनकर, अनिल पाल, बंडू भोयर, कालिदास निकुरे, विलास मेश्राम, दीपक भोयर, राजू निकुरे, शालिनीताई पेंदाम, कविता उराडे, रिता गोवर्धन, कल्पना नंदेश्वर, वाय.जी. बानबले, कालिदास मोहुर्ले, चारुदत्त पोहाणे, विवेकानंद हुलके, स्वप्निल बेहेरे, मारोती अलोने, सचिन गवतुरे, पुरुषोत्तम चिंचोलकर, संतोष भांडेकर, समीर दिघे आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button