गडचिरोलीविदर्भ

फुटबॉलच्या स्पर्धेतून आंतराष्ट्रीय खेळाळू निर्माण व्हावे – अम्ब्रिशराव आत्राम

मूलचेरा तालुका क्रीडा संकुल येथे फुटबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण

मूलचेरा : तालुक्यातील विवेकानंदपूर येथील तालुका क्रीडा संकुल येथे स्वामी विवेकानंद फुटबॉल कमिटीतर्फे गेल्या सात दिवसापासून फूटबॉल सामने सुरू आहेत. मोठ्या संख्येने फुटबॉल स्पर्धकांनी यावेळी हजेरी लावली. फुटबॉल प्रेमींनी क्रीडा संकुल तुडूंब भरून होते.

फुटबॉल स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम तर प्रमुख अतिथी म्हणून कुमार अवधेशरावबाबा आत्राम हे होते. कमिटीतर्फे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना अम्ब्रिशराव आत्राम म्हणाले, फुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. आपल्या क्षेत्रातील बंगाली बहुल भागात मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट दर्जाचे उत्तम खेळाडू घडतील, आपल्या क्षेत्राचा नावलौकिक वाढेल तसेच या फुटबॉलच्या स्पर्धेतून आंतराष्ट्रीय खेळाळू निर्माण व्हावे असे मत त्यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना ते म्हणाले या तालुका क्रिडा संकुलाची निर्मिती माझ्या कार्यकाळात झाली. येणाऱ्या काळात या क्रिडा संकुल मध्ये ज्या सुविधांचा सुवीधाचा अभाव आहे, ते मी पूर्ण करून देण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करणार असे आश्वासन यावेळी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिले.

यावेळी गौरव बाला फॅन्स क्लबतर्फे नायजेरिया येथील संघाने आपलं उत्तम प्रदर्शन करून सर्व प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित केलं. स्पर्धेतील प्रथम क्र. विजेत्या गांधीनगर संघाल माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या तर्फे 50000/- (पन्नास हजार रुपये) देण्यात आले तर भाजपा जिल्हा सचिव बादल शाह यांच्यातर्फे द्वितीय क्र. विजेत्या नायजेरिया संघाल 31000/- (एकतीस हजार रुपये) पारितोषिक देण्यात आले. तर संपूर्ण स्पर्धेसाठी ट्रॉफी पुरस्कार हा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांच्या तर्फे 35000/- (पस्तीस हजार रुपये) देण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष उरेते, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दत्ता, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष गणपती, तालुका अध्यक्ष संजीव सरकार, शहराध्यक्ष दिलीप आत्राम, महामंत्री विजय बिश्वास, तालुका उपाध्यक्ष गणेश गारघाटे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष किशोर मलिक, सरफराज आलम, शुभम कुत्तरमारे तसेच मोठ्या संख्येने युवा व महिला वर्ग उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button