भंडाराविदर्भ

‘सरदार @ १५०’ जिल्हास्तरीय युनिटी पदयात्रेचा भंडारा येथे शुभारंभ

राष्ट्रीय एकता, आत्मनिर्भर भारत आणि नशामुक्तीच्या प्रतिज्ञा ; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

भंडारा : जिल्हा प्रशासन आणि युवा कार्यक्रम तथा क्रीडा मंत्रालय (भारत सरकार) अंतर्गत ‘मेरा युवा भारत भंडारा’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सरदार @ १५०’ जिल्हास्तरीय युनिटी (एकता) / पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत बेला येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव आणि सरपंच शारदा शेडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. भोजराज श्रीरामे (NSS अधिकारी), सुशील भड (जिल्हा युवा अधिकारी), सचिन गभणे (प्राचार्य, महेंद्री विज्ञान व कला महाविद्यालय, बेला) उपस्थित होते. पदयात्रेदरम्यान अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी उपस्थित सर्व युवक-युवतींना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ, आत्मनिर्भर भारत संकल्प, नशामुक्त भारत प्रतिज्ञाबद्ध करून घेतले. यावेळी महेंद्री विज्ञान व कला महाविद्यालय, बेला यांच्यावतीने देशभक्तीवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

या पदयात्रेत महेंद्री विज्ञान व कला महाविद्यालय, बेला, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय (बेला), माणिकराव सुखदेवे विद्यालय आणि जि. प. माध्यमिक विद्यालय या संस्थांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे संचालन शुभांगी सरोदे यांनी केले, तर रमेश अहिरकर यांनी आभार प्रदर्शन केले. या पदयात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी खोब्रागडे (ग्रामसेवक, बेला), अतुल गेडाम (युवा प्रतिनिधी) आणि ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button