गडचिरोलीविदर्भ

दारूविक्री हद्दपार करण्यासाठी संघर्ष करणार

मुक्तिपथ देसाईगंज शहर संघटनेची ; विविध मुद्द्यांवर चर्चा

गडचिरोली : देसाईगंज येथील मुक्तिपथ तालुका कार्यालयात शहर संघटनेची बैठक नुकतीच 6 फेब्रुवारी रोजी पार पडली. बैठकीला एकूण 17 सदस्य व मुक्तिपथचे सहसंचालक संतोष सावळकर व तालुका संघटक भारती उपाध्ये उपस्थित होत्या. प्रत्येक वार्डातील वार्ड संघटनेच्या अध्यक्षांनी आपापल्या वार्डची दारू बंदी स्थिती काय आहे. कृतीसाठी पुढची रणनीती काय केली पाहिजे इत्यादी मुद्द्यावर मांडणी व चर्चा केली.

यानुसार सध्या वडसा शहरात 17 प्रभागांपैकी चार प्रभागांमध्ये अवैध दारूविक्री अजून मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे, अशी माहिती पुढे आली. यामध्ये प्रामुख्याने आंबेडकर वॉर्ड, विर्शी वॉर्ड, गांधी वार्डामध्ये प्रमुख विक्रेते आहेत व विक्री सुरू असते, इथे कारवाईची गरज आहे, असे ठरविण्यात आले. हनुमान वार्डामध्ये एक महिला दारू विक्री करते ती बंद झाली पाहिजे अशी वार्डातिल महिलांची मागणी आहे. नैनपूर वार्ड, भगतसिंग वॉर्ड, समता वार्डात मागील काही महिन्यांपासून अवैध दारूविक्री पूर्णपणे बंद आहे, हे टिकवून ठेवण्यासाठी वार्डातील संघटन सदस्यांनी पाठपुरावा नियमित ठेवला पाहिजे. वार्ड संघटनेतील सदस्य संख्या वाढली पाहिजे असे ठरविण्यात आले.

दारूविक्री सुरू असलेल्या वार्डातील दारू बंद करण्यासाठी सर्व महिलांनी एकत्र येऊन दारू विक्रेत्याकडे जाऊन पोलिसांच्या मदतीने नोटिस देणे, अहिंसक कृती करणे, मुजोर व तडीपारीच्या पातळीचे जे विक्रेते आहे त्यांना जिल्ह्यातून तडीपार करावे यासाठी उपविभागीय महसूल अधिकारी यांना निवेदन देणे. पोलिस विभागाला निवेदन देणे व कारवाई करिता दबाव आणणे इत्यादी कृती करण्याचे ठरले. या बैठकीच्या निमित्ताने आपल्या वार्डात दारू बंदी कशी केली या विषयीची कहाणी 2-3 सदस्यांकडून सांगण्यात आली. बैठकीत केलेल्या नियोजनानुसार कृती करण्याचे ठरवून बैठकीची सांगता करण्यात आली.

यावेळी यावेळी मुक्तिपथ तालुका शहर संघटन अध्यक्ष शेवंता अवसरे, उपाध्यक्ष निलोफर शेख, सचिव कल्पना कापसे यांच्यासह गांधी वॉर्ड, हेटी वॉर्ड, जुनी वडसा, हटवार एरिया, राजेंद्र वॉर्ड, माता वॉर्ड, भगतसिंग वॉर्ड, स्मारक एरिया, जुनी वडसा, नैनपुर, आंबेडकर वॉर्ड, हनुमान वॉर्ड कीन्हाला, मोहटोला, शंकरपुर, विसोरा, कोंढाळा, इत्यादी गावे आणि वॉर्ड मधून संघटना सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button