गोंदियाविदर्भ

भरधाव ट्रकच्या धडकेत सायकलस्वाराचा जागीच मृत्यू

कोहमारा येथे भीषण अपघात

गोंदिया : गोंदिया-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा येथे शनिवारी (दि.१७) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास एका भीषण अपघातात सायकलस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने धडक दिल्याने सायकलस्वाराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तो आज सकाळी कामासाठी सडक अर्जुनीकडे जात होता. सकाळी सुमारे ९:४५ वाजता कोहमारा येथील नवेगावबांध रोड चौकात नागपूरकडून रायपूरच्या दिशेने जाणाऱ्या एनएल ०१-एइ ७१३४ क्रमांकाच्या ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. ट्रकचालकाने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात ट्रक चालवल्याने हा अपघात झाला.

ट्रकच्या चाकाखाली आल्याने सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच डुग्गीपार पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान, पोलिसांनी ट्रक चालकाला ट्रकसह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button