गडचिरोलीविदर्भ

माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून जेष्ठ कार्यकर्ते मारटकर यांना आर्थिक मदत

मूलचेरा : अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक सर्वसामान्य कार्यकत्यांच्या सुख दुःखात, अडीअडचणीत, मदत करणारे आणि आपल्या कार्यकर्त्यांसोबत जिव्हाळ्याचा नात जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.

मूलचेरा तालुक्यातील स्थानिक लगाम या गावातील जेष्ठ कार्यकर्ते अरुण मारटकर हे अनेक महिन्यापासून (बीपी व शुगर) या बिमारीमुळे त्रस्त आहेत. त्यांचा उपचार चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात करण्यात आला असल्याने आर्थिक प्रश्न निर्माण झाला. ही बाब अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना कळताच त्यांनी तात्काळ आपले स्थानिक कार्यकर्ते पाठवुन मारटकर यांच्या कुटुंबाला 10 हजार रुपयांची आर्थिक मदत केली व आपण सर्वोतोपरी पुन्हा सहकार्य करू असे आश्वासन दिले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष उरेते, वैष्णव ठाकूर, सागर मडावी, गणेश कडते आणि मारटकर कुटुंबातील सदस्य नितीन मारतकर, सचिन मारतकर हें उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button