
गडचिरोली : भारतीय संविधान दिनानिमित्त गोंडवाना विद्यापीठात “भारतीय संविधान: राष्ट्र उभारणीचा पाया” या विषयावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
भारतीय संविधानास 26 नोव्हेंबर 2025 रोजी 76 वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून, गोंडवाना विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्यावतीने 26 रोजी सकाळी 11.30 वा. विद्यापीठातील नवीन सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. प्रशान्त बोकारे हे राहणार असून, विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी केले आहे.



