गडचिरोलीविदर्भ

राजोलीत 20 वर्षांपासून दारूविक्री बंदीची परंपरा कायम

धानोरा : तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या राजोली गावाने मागील 20 वर्षांपासून दारूविक्री बंदीची परंपरा कायम ठेवली आहे. ग्रामस्थांकडून विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडतात. इतरही गावांनी राजोली या छोट्याशा गावाकडून आदर्श घेण्याचे आवाहन मुक्तिपथने केले आहे.

राजोली हे गाव दुर्गम भागात वसलेले असून लोकसंख्या जवळपास 750 एवढी आहे. गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती, मजुरी आहे. सदर गावात 20 वर्षांपूर्वी दारूविक्रीमुळे निर्माण होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन गावकऱ्यांनी एक होऊन दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली. हा निर्णय गाव हितार्थ ठरला. तेव्हापासून गावात दारूचा एक थेंबही येऊ दिला नाही. गावात दारूच मिळत नसल्याने व्यसनाचे प्रमाण कमी आहे. गावात होणारे धार्मिक, सामाजिक व वैयक्तिक कार्यक्रम शांततेत पार पडतात. युवा पिढी सुद्धा रोजगार, शिक्षण या कामामध्ये व्यस्त आहे.

ही दारूविक्री बंदीमुळे गावात असलेली शांतता टिकून राहावी, याकिरता सरपंच लक्ष्मीताई सीडाम, पोलिस पाटील मेघश्याम वरसकर यांच्या सह ग्रामस्थ सक्रीय आहेत. गावात मुक्तीपथ शक्तीपथ महिला संघटना सुद्धा कार्यरत असून व्यसनविरोधी विविध उपक्रम राबवून ग्रामस्थांना जागृत केले जात आहे. लोक सहभागातून लागू केलेल्या दारूविक्री बंदीला कोणताही धोका निर्माण होऊ नये, याकरिता धानोरा मुक्तीपथ टीम तर्फे वेळोवेळी बैठक घेऊन मार्गदर्शन केले जाते. गावातील लोकांसाठी व्यसन उपचार, जनजागृती कार्यक्रम घेतले जातात. या गावाचे कार्य कौतुकास्पद असून इतरही गावांनी आपल्या गावातून अवैध दारूविक्री हद्दपार करून गाव विकास साधावा असे आवाहन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button