गडचिरोलीविदर्भ

कमी दाबाच्या विद्यूत पुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त ; विजवितरण कार्यालयावर दिली धडक

तातडीने दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

कूरखेडा : कूरखेडा, आंधळी, चिचटोला, चिखली, नान्ही व परीसरातील कृषी पंपाना अत्यंत कमी दाबाचा विद्यूत पूरवठा होत असल्याने पंप निकामी ठरत रब्बी पीकाला पाणी पुरवठा करणे शेतकऱ्यांना अडचणीचे होत आहे. त्यामूळे त्रस्त शेतकऱ्यांनी विजवितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयावर धडक देत उपविभागीय अभियंता मूरकूटे यांचाशी चर्चा केली व तातडीने दूरूस्ती करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा आंदोलन तिव्र करण्याचा इशारा दिला.

परीसरात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात धान व मका पीकाची लागवड केली आहे. पिकांना यावेळी पाण्याची गरज असते. मात्र या परीसरात अत्यंत कमी दाबाचा विद्युत पूरवठा होत असल्याने पंप निकामी ठरत आहेत व पंपाद्वारे पाण्याची निकासी शक्य होत नाही आहे. त्यामूळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. तसेच दिवसातील २४ तासापैकी १२ तास विज पूरवठ्याचा आदेश असतानाही कृषी पंपांना १२ तास विज मिळत नाही व १ ते २ तास विज खंडीत असते ही अडचण तातडीने दूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच तालूक्याकरीता १३२ केव्ही क्षमतेचा विद्युत सब स्टेशन मंजूर आहे. मात्र अद्यापही सदर सब स्टेशनचे बांधकाम सूरू करण्यात न आल्याने विद्युत संदर्भात अनेक अडचणींचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. तातडीने सदर बांधकाम सूरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली व निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शेतकरी बांधव हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button