गडचिरोलीमहाराष्ट्रविदर्भ

मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

मरपल्ली येथील घटना 

एटापल्ली : तालुक्यातील मरपल्ली येथे मासे पकडण्यासाठी गेलेला युवक बंधाऱ्याच्या पाण्यात वाहून गेला. ही घटना ८ जुलै रोजी रात्री दहा वाजता घडली.

मरपल्ली येथील डुम्मी नाल्यावरील बंधाऱ्याजवळ ८ रोजी रात्री दहा वाजता तीन युवक गेले होते. यावेळी मासे पकडताना बंधाऱ्यात अडकलेले लाकूड काढताना अंकुश उर्फ अक्षय पांडू कुडयेटी (वय २३) हा खाली कोसळला. यावेळी सिमेंटच्या खांबाचा मार पोटाला लागल्याने तो पाण्यात बुडाला. सोबत गेलेले विलास हिचामी (वय ४२) व अभिजित सिडाम (वय २२) हे दोघे आरडाओरड करत गावात परतले. तहसीलदार हेमंत गागुर्डे व ठाणेदार नीलकंठ कुकडे यांनी 9 रोजी शोधमोहीम राबवली. अखेर दुपारी अडीच वाजता त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. अंकुश कुडयेटी याच्या शोधकार्यावेळी बंधारा परिसरात मोठी गर्दी झाली होती.

घटनास्थळापासून जवळच एका झुडपाला त्याचा मृतदेह अडकलेला आढळून आला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपविला. दरम्यान, या घटनेनंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे परिसर सुन्न झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button