
गडचिरोली : संयुक्त राष्ट्र संघाने ९ ऑगस्ट हा दिवस जागतीक मुलनिवासी (आदिवासी) दिन म्हणून घोषीत केला. त्या अनुषंगाने शुक्रवार, ९ ऑगस्ट २०२४ रोजी “जागतिक मुलनिवासी (आदिवासी) दिन” साजरा करण्यात येत आहे. त्या प्रित्यर्थ आदिवासी गुणवंत विद्यार्थी, शासन पुरस्कार प्राप्त आदिवासी व्यक्ती, सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या आदिवासी समाजातील नागरिकांचा “भव्य सत्कार व समाज प्रबोधन कार्यक्रम” आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते होणार आहे. सह उद्घाटक म्हणून आमदार डॉ. देवराव होळी उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कै. बाबुरावजी मडावी स्मारक समितीचे अध्यक्ष गुलाबराव मडावी राहणार आहेत. तसेच मुख्य मार्गदर्शक म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्रा. डॉ. संतोष सुरडकर, गोंडवाना संस्कृतीचे अभ्यासक व अलाईव्ह यु-ट्युब चॅनलचे संचालक राहुल कन्नाके, यवतमाळच्या सामाजिक कार्यकर्त्या कुंदाताई तोडकर (तोडसाम मडावी) तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे विदर्भ कार्याध्यक्ष घनश्याम मडावी, आदि. हलबा हलबी कर्मचारी महासंघ राज्याध्यक्ष फरेंद्र कुत्तीरकर, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, स्पंदन हॉस्पीटलचे संस्थापक डॉ. मिलींद नरोटे, नेत्रतज्ञ डॉ. किरण, सामाजिक कार्यकर्ते अॅड. विश्वजीत कोवासे, शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख वासुदेवजी शेडमाके, नेत्र चिकित्सक डॉ. एल.जी. वट्टी, दंत चिकित्सक डॉ. सोनल कोवे, दंतचिकित्सक डॉ. चेतन कोवे, डॉ. बागराज धुर्वे, डिवाईन हॉस्पीटलचे डॉ. विवेक आत्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ. तारकेश्वर उईके, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर ताराम, अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिलीप कुमरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर मडावी, अप्पर कोषागार अधिकारी मनोज कंगाले, वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम, सेवानिवृत्त तहसिलदार पुष्पलता कुमरे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, जिल्हा व तालुका शाखा गडचिरोलीतर्फे करण्यात आले आहे.



