
भंडारा : जिल्हा पोलिसांनी दारू व जुगार अड्ड्यांवर धाड घालून तब्बल दोन लाख १८ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई करडी, भंडारा, वरठी, सिहोरा व पवनी पोलिस ठाणे हद्दीत केली आहे. करडी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्यांच्या ताब्यातून तब्बल एक लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात शैलेश शरद शेंडे (रा. करडी), संदीप प्रल्हाद बडगे (रा. पांजरा) व पितांबर बांते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरठी पोलिसांनी शुभम पालांदुरकर (रा. नेरी) याच्या ताब्यातून सहाशे रुपयांचे दारूने भरलेले पव्वे जप्त केले.
दुसऱ्या कारवाईत बीड येथील विजय शहारे यांच्या ताब्यातून हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. आंधळगाव पोलिसांनी गणेश निमजे यांच्या ताब्यातून ४८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पवनी पोलिसांनी सावरला येथील जीवनकोर दुधानी या महिलेच्या ताब्यातून देशी दारू जप्त केली.



