
चंद्रपूर/गडचिरोली : पावसाळ्याच्या दिवसांत विजेचा धोका वाढतो, त्यामुळे वीज यंत्रणेपासून सावधगिरी बाळगल्यास संभाव्य वीज अपघात टाळता येऊ शकतात, असे आवाहन महावितरणने केले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी २४ तास कार्यरत असणारी कंट्रोल रूम आणि शाखा कार्यालयांची विशेष सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे.
अतिवृष्टी आणि वादळामुळे तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूने असलेले फिडर पिलर, रोहित्राचे लोखंडी कव्हर, फ्युज बॉक्स तसेच घरातील ओलसर विद्युत उपकरणे, शेती पंपाचे स्विच बोर्ड इत्यादींकडे दुर्लक्ष केल्यास दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. वीज वाहिन्यांवर झाडे पडल्याने कधीकधी वीजखांब वाकले जातात, ज्यामुळे वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. अशा तुटलेल्या किंवा लोंबकळणाऱ्या वीजतारांमध्ये वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावध राहावे. त्यांना हात लावण्याचा किंवा हटवण्याचा प्रयत्न करू नये. तसेच, रोहित्राचे (डी.पी.) झाकण उघडे दिसल्यास तात्काळ जवळच्या महावितरण कार्यालयाला कळवावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत ग्राहकांसाठी २४ तास सुरू असणाऱ्या ‘महावितरण’च्या नियंत्रण कक्षातील आणि शाखा कार्यालयांचे संपर्क क्रमांक जारी करण्यात आले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यासाठी:
- नियंत्रण कक्ष: ७८७५७६११९५
- रामनगर शाखा: ७८७५१०७३३६
- तुकुम शाखा: ७८७५१०७७२२
- एमआयडीसी शाखा: ७८७५१०७१४९
- शास्त्रीनगर शाखा: ७८७५११०१६९
- बाबूपेठ शाखा: ७८७५१०८५६३
- बालाजी शाखा: ७८७६७६१३३६
- समाधी शाखा: ७८७५११०१५३
- हॉस्पिटल शाखा: ७०६६०३६२३०
गडचिरोली जिल्ह्यासाठी:
- नियंत्रण कक्ष: ७८७५००९३३८
- गडचिरोली शहर शाखा: ७८७५७६१७९०
- गडचिरोली ग्रामीण शाखा: ७८७५७६१७९१
- गडचिरोली कॉम्प्लेक्स शाखा: ७८७५७६१७९२
वादळवारा आणि पावसामुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीसाठीच या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. यासोबतच, महावितरणने वीज ग्राहकांसाठी १९१२ / १९१२० / १८००२१२३४३५ / १८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून दिले आहेत. हे टोल फ्री क्रमांक वीज बिलाच्या देयकावर देखील नमूद केलेले आहेत.



