
जिल्हाधीकारी नायर यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र प्रदान
गोंदिया : देशात २५ जून १९७५ ते ३१ मार्च १९७७ या काळात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी लढा दिलेल्या आणि तुरुंगवास भोगलेल्या नागरिकांचा गोंदिया येथे सन्मान करण्यात आला. नवीन प्रशासकीय इमारत, जयस्तंभ चौकात आयोजित या गौरव सोहळ्यात जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देऊन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी संघर्षयात्रींचा गौरव केला. यावेळी काही वयोवृद्ध लढवय्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या आसनस्थळी जाऊन सन्मानित केले.
या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बहिरे, तहसीलदार समशेर पठाण, अप्पर तहसीलदार श्रीकांत कांबळे, उपजिल्हाधिकारी शुभम पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांच्यासह जिल्ह्यातील विविध संघर्ष सैनिक व त्यांचे वारसदार उपस्थित होते.
यावेळी शोभेलाल आत्माराम बोपचे, बेनीराम हरिराम कटकवार, कुशीलाल उकाजी रहांगडाले, बुधराम झाडू काटेखाये, साधुराम भिवराम ठाकरे, भैयालाल बिसनजी मानकर, हरीराम मोतीराम करंडे, घनश्याम भागवत डोये, गोवींदराव रामलाल पुंडे, गोपीचंद दादुजी पटले, नारायन केशरीचंद कटकवार, सुधाकर देवराव रानडे, धनलाल हिरूद उईके, घनश्याम उदयराम अग्रवाल, राम दिनकरराव टोळ, त्रिलोकीनाथ शिवदत्त शर्मा, भगीरथ छोटेलाल यादव, मधुकर विठलराव ढोके, इंद्रराज ताराचंद ठाकुर, मधुकर मनाजी दुनेदार, शंभु आडकु नाकाडे या लोकशाही संघर्षयोद्ध्यांचा सन्मानपत्र आणि कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून गौरव करण्यात आला.



