क्राईमगडचिरोलीविदर्भ

सुगंधित तंबाखू वाहतूक करणाऱ्या वाहनासह 9.24 लाखांचा मुद्देमाल जप्त

दोघांवर गुन्हा दाखल ; स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेली सुगंधित तंबाखू राज्यात अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गडचिरोली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 9 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची धडक कारवाई 22 एप्रिल रोजी अर्जुनी-देसाईगंज मार्गावर करण्यात आली. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या सूचनेनुसार अवैध व्यवसायांवर नियंत्रण आणण्यासाठी सुरु असलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई पार पडली.

गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून सिल्व्हर रंगाच्या टोयोटा इनोव्हा (एमएच-15/बिएन-5689) या वाहनाला अडवले. वाहनाची तपासणी केली असता त्यात 5,44,304 रुपयांचा सुगंधित तंबाखू आढळला. या तंबाखूची मालकी रवी मोहनलाल खटवानी (रा. गोंदिया) याची असल्याचे चालक अस्पाक मुत्रा शेख (वय 25, रा. संजयनगर, पिंडकेपार, जि. गोंदिया) याने कबूल केले. सुगंधित तंबाखू व्यतिरिक्त 3,80,000 रुपयांचे इनोव्हा वाहन देखील जप्त करण्यात आले असून, एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 9,24,304 रुपये इतकी आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता-2023 व अत्र सुरक्षा आणि मानके अधिनियम-2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि. संदिप आगरकर हे पुढील तपास करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख व एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सरीता मरकाम, दिपक लेनगुरे, प्रेमानंद नंदेश्वर, सचिन घुबडे, निशिकांत अलोणे व निकेश कोडापे यांच्या पथकाने केली. सदर कारवाईने अविद्या व्यावसायिकांचे, तस्करांचे धाबे दणाणले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button