गडचिरोलीविदर्भ

आ. डॉ. देवराव होळी विकासासाठी झटणारा सर्वसामान्यांचा नेता – ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे

बोरी येथे लाडक्या बहिणींचा भव्य मेळावा

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रात मागील १० वर्षापासून जेवढी विकास कामे आमदार डॉ. देवराव होळी यांनी आणली तेवढी कामे आज पर्यंतच्या एकाही आमदाराला शक्य झाले नाही. आमदार डॉ. देवराव होळी सतत विकासाची दृष्टी ठेवून काम करणारा विकासासाठी लढणारा नेता असून सर्वसामान्यांचा माणूस असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे ओबीसी मोर्चाचे चिटणीस बाबुराव कोहळे यांनी बोरी येथे झालेल्या लाडक्या बहिणींच्या मेळाव्याच्या प्रसंगी केले.

यावेळी मंचावर आमदार डॉ. देवराव होळी, भाजपा जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, सरपंच किरण सुरजागडे, कविता उरकुडे, संगीता फाले, वैशाली गद्दे, रेश्मा ठुसे, सुमित्रा सातपुते, पलाशी गुडिया यांचेसह मान्यवर उपस्थित होते. महिला मेळाव्याला परिसरातील लाडक्या बहिणींनी प्रचंड गर्दी केली.

यावेळी बोलताना बाबुराव कोहळे म्हणाले की, गडचिरोली विधानसभा क्षेत्रात कोटगल बॅरेज सारखा मोठा सिंचन प्रकल्प आणून गडचिरोली जिल्हा केंद्राची तहान व परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाची समस्या मिटवली. जिल्ह्यात पहिल्यांदाच शासकीय मेडिकल कॉलेज आणून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिली सुरजागड कोणसरी सारख्या मोठ्या लोह प्रकल्पातून जिल्ह्यातील स्थानिक लोकांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध दिली. आमदार डॉ. देवराव होळी यांनी आत्तापर्यंत विधानसभा मध्ये हजारो कोटींची विकास कामे केली असून विकासाची दृष्टी ठेवून काम करणारा नेता असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत लाडक्या बहिणींनी आमदार देवराव होळी यांच्या पाठीशी राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button