गोंदियाविदर्भ

महाराजस्व समाधान शिबिराच्या पहिल्या टप्प्याचा नागरिकांना लाभ – जिप अध्यक्ष लायकराम भेंडारकर

जिल्ह्यात महाराजस्व समाधान शिबिरात 6328 प्रकरणांचा निपटारा

गोंदिया : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियानातील पहिल्या टप्प्यातील दुसऱ्या शिबिराचाही नागरिकांना लाभ झाला असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव/देवी मंडळात महाराजस्व समाधान शिबिराच्या पहिल्या टप्प्यातील दुसरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. या समाधान शिबिरात अपर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

भेंडारकर पुढे म्हणाले, महसूल विभागाच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या दारी मुलभूत योजनांचा लाभ देण्याचा शासनाचा कौतुकास्पद उपक्रम आहे. गावपातळीवर एकाच ठिकाणी पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळत असल्याने नागरिकांना तहसिल कार्यालयापर्यंतही जावे लागत नसल्यामुळे नागरिकांची पायपीट यामुळे थांबलेली असल्याचे त्यांनी यावेळी व्यक्त केले.

अपर जिल्हाधिकारी मुल्ला म्हणाले, येत्या काळात शाळा प्रवेश प्रकरण अधिक होणार असून विद्यार्थ्यांचे आवश्यक प्रमाणपत्र वितरण बाबत शाळांना सोबत घेऊन समन्वयाने कार्यवाही पार पाडण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. यासह त्यांनी महाराजस्व अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या लाभांबाबत लाभार्थ्यांना लाभ उचलून जीवनमान सुस्थितीत करावे असेही सांगितले.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव/देवी येथे झालेल्या शिबिरामध्ये 750 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. गोंदिया तालुक्यातील कुडवा मंडळात टी.बी.टोली मैदान गोंदिया येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी मानसी पाटील, तहसिलदार समशेर पठाण, अपर तहसिलदार श्रीकांत कांबळे, उपअधीक्षक भूमी अभिलेख अजय क्षीरसागर व माजी समाज कल्याण सभापती पुजा शेठ उपस्थित होते. शिबिरात विविध एकूण 464 प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा मंडळात जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा मुंडीकोटा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी पुजा गायकवाड, तहसिलदार नारायण ठाकरे व लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थ्यांना विविध प्रकारचे एकूण 1963 प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

 

गोरेगाव तालुक्यातील कमरगाव मंडळात जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा कमरगाव येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी जि.प. अर्थ व बांधकाम सभापती लक्ष्मण भगत, पं.स. उपसभापती रामेश्वर महारवाडे, अपर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, कमरगाव ग्रामपंचायत सरपंच व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते एकूण 447 लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. देवरी तालुक्यातील देवरी मंडळात ग्रामपंचायत कार्यालय भर्रेगाव येथे उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, अपर तहसिलदार चिचगड नवनाथ कातकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत एकूण 890 लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

आमगाव तालुक्यातील कट्टीपार मंडळात ग्रामपंचायत कार्यालय घाटटेमणी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी लाभार्थ्यांना एकूण 490 विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. सालेकसा तालुक्यातील साकरीटोला मंडळात ग्रामपंचायत कार्यालय मक्काटोला येथे निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे व तहसिलदार नरसय्या कोंडागुर्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत पात्र लाभार्थ्यांना एकूण 904 विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी मंडळात ग्रामपंचायत कार्यालय कोसमतोंडी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी ज्योती कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थ्यांना एकूण 420 विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button