
ढाबा चालकावर गुन्हा दाखल
कुरखेडा : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही कुरखेडा तालुक्यातील मालदुगी गावाजवळ असलेल्या फॅमिली ढाब्यावर अवैध दारूविक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर कुरखेडा पोलिसांनी पोलिसांनी धाड टाकून १७,५०० रुपयांची विदेशी दारू जप्त केली.
पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाला १ डिसेंबर रोजी मालदुगी गावाजवळील D1 फॅमिली ढाब्यावर अवैध दारूविक्री होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि ढाबा तसेच त्याच्या आजूबाजूच्या शेतात छापा टाकला. तपासणीदरम्यान Royal Stag कंपनीची एकूण ₹ १७,५०० किमतीची विदेशी बनावटीची दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी ढाबा चालक दादाजी कृष्णाजी नाकतोडे (वय ५२, रा. गोठणगाव, ता. कुरखेडा) यांच्याविरुद्ध कुरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ, सहाय्यक फौजदार मच्छिरके, हेड कॉन्स्टेबल शेखलाल मडावी आणि पोलीस कॉन्स्टेबल कोरे यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रेमचंद मच्छिरके हे करीत आहेत.



