
राष्ट्रीय एकता मंचतर्फे आयोजन ; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
देसाईगंज : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त केले. या ‘मिशन सिंदूर’मध्ये भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांनी शेकडो दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, तसेच भारतीय महिलांच्या ‘सिंदूर’चे रक्षण करत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना कठोर संदेश दिला. या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ आणि भारतीय सैनिकांच्या अतुलनीय शौर्याचा सन्मान करण्यासाठी देसाईगंज शहरात राष्ट्रीय एकता मंचतर्फे २० मे रोजी सायंकाळी ४ वाजता एका भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय एकता मंचने देसाईगंज आणि परिसरातील सर्व नागरिकांना, विद्यार्थ्यांना आणि राजकीय कार्यकर्त्यांना या देशप्रेमाने ओतप्रोत असलेल्या तिरंगा यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन भारतीय सैनिकांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन केले आहे. ‘मिशन सिंदूर’च्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आणि आपल्या शूर जवानांना आदरांजली अर्पित करण्यासाठी ही तिरंगा यात्रा एक महत्वपूर्ण माध्यम ठरणार आहे.



