
रोजगार मेळावा व वाहन लोकार्पण सोहळ्याला लावणार उपस्थिती, पोलीस मुख्यालयातील विविध कार्यक्रमांना करणार मार्गदर्शन
गडचिरोली : राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय तसेच कामगार राज्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल हे गुरुवार, १६ एप्रिल रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते पोलीस मुख्यालयातील महत्त्वाच्या शासकीय उपक्रमांना उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
सकाळी ११:०० वाजता: गडचिरोली शहरात आगमन. त्यानंतर पोलीस मुख्यालय येथे आयोजित भव्य ‘रोजगार मेळावा’ आणि ‘वाहन लोकार्पण’ कार्यक्रमास ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. दुपारी १२:०० वाजता: वेळ राखीव. दुपारी २:१५ वाजता: शासकीय कार्यक्रमांची सांगता करून ते हेलिकॉप्टरने नागपूरकडे प्रयाण करतील.
पोलीस दलाच्या वतीने आयोजित या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच, पोलीस दलाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या वाहनांचे लोकार्पण सहपालकमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.



