महाराष्ट्रमुंबई

भाजपचे पक्षात निष्ठावंतांना घरी आणि बाहेरच्यांना डोक्यावर बसवा असे धोरण – काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांची टीका

महापालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवर आघाडीचे निर्णय होणार, शक्य तिथे स्वबळावर, शक्य तिथे आघाडी अशी काँग्रेसची भूमिका – वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट

मुंबई : राज्यात महापालिका निवडणूक सत्ता मिळवण्यासाठी निष्ठावंतांना घरी आणि बाहेरच्यांना डोक्यावर बसवा असे भाजप पक्षाचे धोरण असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली.

नाशिक इथे भाजप पक्षप्रवेशाने बिचाऱ्या आमदाराच्या डोळ्यात पाणी आले. स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलून पक्ष प्रवेश होत असल्याने त्या पक्षात आता हुकूमशाही आलेली आहे. सत्तेसाठी भाजपला चोर, बलात्कारी, खुनी, ईडी, सीबीआय मधील सगळे चालतात, भाजप हा सत्तेसाठी झपाटलेला पक्ष असल्याचा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.

मुंबईत दादर इथे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत येणाऱ्या महापालिका निवडणुकांचा आढावा घेण्यात आला. स्थानिक परिस्थिती, उमेदवार याबाबत बैठकीत चर्चा झाली. स्थानिक पातळीवरील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन आघाडीचा निर्णय होईल. जिथे शक्य तिथे आघाडी जिथे शक्य नाही तिथे स्वबळावर काँग्रेस निवडणूक लढवणार अस वडेट्टीवार यांनी मुंबईत आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button