
गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील ग्राम तेढा येथे विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. १३) सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे. सविता मनोज जगनिक (३५, रा. तेढा) हे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.
सविता सोमवारी (दि. १२) सायंकाळी ४ वाजतापासून १३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली आहे. शोभेलाल श्रीराम कुडभरे (५१, रा. तेढा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सविता जगनिक सोमवारी (दि. १२) सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान घरातून कोणालाही न सांगता निघून गेली होती. रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने नातेवाईक व गावकऱ्यांनी तिचा शोध घेतला. मात्र, ती आढळून आली नाही. मंगळवारी (दि. १३) दुपारी गावातील सार्वजनिक विहिरीजवळ चपला आढळून आल्याने संशय बळावला. त्यानंतर विहिरीत शोध घेतला असता, विहिरीत मृतदेह आढळून आला. गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीतून सविताचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार कोडापे करीत आहेत.



