भंडारामहाराष्ट्रविदर्भ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर
विविध विकासकामांचे करणार भुमिपूजन

भंडारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 24 जून रोजी जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार, 24 जून रोजी सकाळी 10 वाजता वर्षा निवासस्थान येथून मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता मुंबई विमानतळावरून नागपूरकडे प्रयाण. सकाळी 11.45 वाजता नागपूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने वैनगंगा नदीकाठाकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता जलपर्यटन प्रकल्पाच्या पहील्या टप्प्याचे भुमिपूजन करून दुपारी 12.40 वाजता मोटारीने रेल्वे ग्राऊंडकडे प्रयाण व भंडारा विधानसभा क्षेत्रातील 547 कोटींच्या विकास कामाचे भुमिपूजन व कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहतील. दुपारी दोन वाजता मोटारीने नागपूर विमानतळाकडे प्रयाण करतील. दुपारी 2.45 वाजता मुंबईकडे प्रयाण करतील.



