गडचिरोलीविदर्भ

गडचिरोली शहरातील तिरंगा बाईक रॅली अभूतपूर्व – आ. डॉ. देवराव होळी

शहरातील तरुणांचा आ. होळी यांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “हर घर तिरंगा” अभियान अंतर्गत तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन

गडचिरोली : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून “हर घर तिरंगा” अभियान अंतर्गत आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वात गडचिरोली शहरात तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. तिरंगा बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी शहरवासीयांना केले होते. त्या आव्हानाला शहरातील तरुण-तरुणी व मातृ शक्तीचा मोठा प्रतिसाद दिसून आला. ह्या बाईक रॅलीने संपूर्ण गडचिरोली शहर तिरंगामय झाल्याचे दिसून आले.

रॅलीची सुरुवात जनसंपर्क कार्यालय चामोर्शी पासून करण्यात आली. ती रॅली गडचिरोली शहरात जनसंपर्क कार्यालयात पोहोचल्यानंतर गडचिरोली शहरातील गांधी चौक, बस डेपो, रामनगर, गोकुळ नगर, आयटीआय बायपास, कारगिल चौक, हनुमान वार्ड मुख्य बाजारपेठ मार्गे फिरून जनसंपर्क कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीतील तरुणांचा प्रतिसाद बघता रॅली अभूतपूर्व असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. देवराव होळी यांनी  समारोपानंतर मार्गदर्शन करताना केले.

तिरंगा बाईक रॅलीमध्ये भाजपा जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, तालुक्याचे अध्यक्ष विलास भांडेकर, शिंदे गटाचे युवा सेनेचे दीपक बारसागडे, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, तालुका महामंत्री बंडू झाडे, रमेश नैताम, आकाश नीकोडे, शहर महामंत्री विवेक बैस, नरेश हजारे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविता उरकुडे, नगरसेविका वैष्णवी नैताम, निमा लाटकर,  महिला आघाडीच्या सुषमा डोईजड, भाजपा युवा नेते संजय मांडवगडे, हर्षल गेडाम, सुभाष उप्पलवार, रोशन आखाडे, देवाजी लाटकर, प्रा. अरुण उराडे, पल्लवी बारापात्रे, सुंदरा करकाडे, यांचेसह तालुका पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button