
गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची आढावा बैठक शहरातील चामोर्शी रोडवरील एका सभागृहात जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीत पक्षाचे राज्य सरचिटणीस आणि गडचिरोली जिल्हा निरीक्षक अतुल वांदिले यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.
बैठकीत राजेंद्र वैद्य (चंद्रपूर जिल्हाध्यक्ष, माजी निरीक्षक), सुरेश पोरेड्डीवार (राज्य सरचिटणीस), ॲड. संजय ठाकरे (राज्य चिटणीस), ओम शर्मा (राज्य चिटणीस), विजय गोरडवार (शहर अध्यक्ष, गडचिरोली), शेमदेव चाफले (ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष), नईम शेख (जिल्हा उपाध्यक्ष), हुसेन शेख (जिल्हाध्यक्ष, अल्पसंख्यांक), परमानंद मल्लिक (उपसभापती, कृषीउबास चामोर्शी), हिमांशु देशमुख (युवक जिल्हाध्यक्ष), करण गण्यारपवार (युवक प्रदेश सचिव), प्रताप गजभिये (कोरची तालुकाध्यक्ष), मीनल चिमुरकर (महिला जिल्हा उपाध्यक्ष), ऋतुजा कन्नाके (जिल्हा सचिव), राजू आत्राम (विधानसभा अध्यक्ष), अमोल गण्यारपवार (जिल्हा को-ऑप. बँक संचालक), क्षितिज उके (वडसा तालुकाध्यक्ष), मनोहर भोयर (गडचिरोली तालुकाध्यक्ष), कबीर आभारे (चामोर्शी तालुकाध्यक्ष), अशोक आडके (मुलचेरा तालुकाध्यक्ष), रमेश चुक्कावार (अहेरी तालुकाध्यक्ष), सत्यनारायण गुप्ता (जिल्हा उपाध्यक्ष), सागर मूलकला (सिरोंचा तालुकाध्यक्ष) आदी मान्यवर उपस्थित होते.
अतुल वांदिले यांनी आपल्या मार्गदर्शनात शरद पवार यांच्या कार्याचा गौरव करत पक्षाला मजबूत करण्याचे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ता मिळवण्याचे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी पक्षाची विकासाभिमुख भूमिका मांडली आणि दिवंगत आर. आर. पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या कार्याची आठवण करून दिली. त्यांच्या निधनानंतर जिल्ह्याचा विकास थांबला असल्याचे त्यांनी सांगितले.
राजेंद्र वैद्य आणि सुरेश पोरेड्डीवार यांनीही यावेळी भाषणे केली. विजय गोरडवार यांनी प्रास्ताविक केले, मुरलीधर नागोसे यांनी सूत्रसंचालन केले आणि सुरेश परसोडे यांनी आभार मानले.
या बैठकीला सुनील कत्रोजवार, नइमा हुसेन, विमल भोयर, सुरेश नैताम, नीलेश कोटगले यांच्यासह माजी नगरसेवक, माजी पंचायत समिती सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.



