गडचिरोलीविदर्भ

दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; एक ठार, दोघे जखमी

तोडसा फाटा वळणावरील घटना 

एटापल्ली : दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर एक तरुण ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि. 9) सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास तोडसा फाट्यावरील वळणाजवळ घडली. रावजी मेस्सो गावडे (वय 26, रा. तोडसा) असे जागीच ठार झालेल्या तरुणाचे नाव असून, उलगे तिम्मा (वय 45, रा. जवेली-खुर्द) व शिवाजी कोत्तू वेळदा (वय 41, रा. तोडसा) अशी गंभीर जखमींची नावे आहे.

सविस्तर वृत्त असे की, रावजी गावडे, शिवाजी वेळदा व अन्य असे तिघे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास तोडसा येथून एमएच 33 / आर- 2408 क्रमांकाच्या दुचाकीने एटापल्लीच्या दिशेने जात होते. तर उलगे तिम्मा व अन्य एक असे विरुद्ध दिशेने एमएच 33 / यू- 2925 ने जवेली गावाकडे जात होते. दरम्यान, तोडसा फाट्यावरील वळणावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक बसली. यात रावजी गावंडे यांच्या छातीला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर उलगे तिम्मा व शिवाजी वेळदा गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. एटापल्ली पोलिसांनी बुधवारी, (दि. 10) घटनेचा पंचनामा केला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button