गडचिरोलीविदर्भ

मोहफुल सडव्यासह 20 हजारांचा मुद्देमाल जप्त ; विक्रेत्यावर गुन्हा दाखल

गडचिरोली : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या कोरची शहरातील वॉर्ड क्रमांक 13  दर्रो टोली येथील विक्रेत्याकडून मोहफुलाच्या सडव्यासह 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करीत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कृती कोरची पोलिस व मुक्तीपथने संयुक्तरीत्या केली.

शहरातील दर्रो टोली वार्डात 4 ते 5 विक्रेत्यांच्या माध्यमातून अवैध दारूविक्री केली जाते. यामुळे विक्रेत्यांच्या घरापुढे शहरातील मद्यपींची रेलचेल असते, अशातच वॉर्ड संघटनेच्या माहितीनुसार कोरची पोलिस व मुक्तीपथ तालूका टीमने दोन दारूविक्रत्यांच्या घर परिसरात तपासणी केली. यावेळी एका विक्रेत्याकडे दारू गाळण्यासाठी लावलेली हातभट्टी, 4 ड्रम मोहफुलाचा सडवा, दारू व साहित्य मिळून आले. पोलिसांनी पंचनामा करून जवळपास 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संबंधित विक्रेत्यावर कोरची पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला. वार्डातील दारूविक्रेत्यावर कारवाई झाल्याने इतर विक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. दारूविक्रेत्यांनी तत्काळ अवैध व्यवसाय बंद करावा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.

ही कारवाई पोलिस निरीक्षक ठाकरे, एपीआय देशमुख यांच्यासह पोलिस कर्मचारी यांनी केली. यावेळी मुक्तीपथचे तालुका संघटक धर्मेंद बोपचे, प्रेरक अरुणा गोंनाडे, स्पार्क कार्यकर्ता भूषण डोकरमारे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button