गोंदियाविदर्भ

तलावात बुडून दोन भावंडांचा मृत्यू 

अरततोंडी (दाभना) येथील घटना

अर्जुनी-मोरगाव : बैल धुण्यासाठी गावातील तलावावर गेलेल्या दोन चुलत भावंडांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अरततोंडी (दाभना) येथे रविवारी (दि.२) दुपारी घडली. दुर्गेश धनंजय पातोडे (१२), रितिक रूपराम पातोडे (१२ वर्षे) रा. अरतोंडी दाभना असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, रविवारी सुटी असल्याने दुर्गेश व रितिक हे दोन्ही चुलत भावंडं दुपारी गावातील तलावावर त्यांचे बैल धुण्यासाठी गेले होते. बैल धुवून झाल्यानंतर त्यांना तलावात अंघोळ करण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे रितिक व दुर्गेश हे दोघेही तलावात उतरले. पण त्यांना तलावातील पाण्याचा अंदाज आला नाही आणि पोहता येत नसल्याने त्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. बराच वेळ लोटूनही मुले घरी न परतल्याने त्यांचे कुटुंबीय तलावाकडे त्यांचा शोध घेण्यासाठी गेले असता तलावात दोन्ही भावंडांचे मृतदेह तरंगतांना आढळले. या घटनेची गावकऱ्यांना माहिती होताच त्यांनी तलावाकडे धाव घेतली व पोलिसांना माहिती दिली. नवेगावबांध पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघा भावंडांचे मृतदेह बाहेर काढले.

दुर्गेश हा वर्गात हुशार होता. दुर्गेश व रितिक हे आपल्या आई-वडिलांना एकुलते एक अपत्य होते. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे दोन्ही पातोडे कुटुंबीयांचे पुत्रछत्र हरपले असून, दुःखाचा डॉगर कोसळला आहे. त्यांचा भविष्यातील आधारच हरवल्याने आई- वडिलांचे दुःख बघवत नव्हते. हे दृश्य बघून उपस्थितांचे मन हेलावले.

दुर्गेश व रितिक या दोघांचे मृतदेह तलावात तरंगताना आढळल्याने या दोघांच्या आई-वडिलांचे अश्रू अनावर झाले. दोघांच्या मातांनी एकच हंबरडा फोडला. दोन्ही मातांना सांभाळताना कुटुंबीयांची स्थिती बिकट झाली होती.

दुर्गेश धनंजय पातोडे व रितिक रूपराम पातोडे ही दोन्ही चुलत भावंडं होती. दोघे चांगले मित्र होते ते कुठेही सोबतच जात होते. रविवारी सुटी असल्याने ते तलावावर बैल धुण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. दोघांच्या मृत्यूने पातोडे कुटुंबीयावर शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button