
राष्ट्रवादी काँग्रेसला नवसंजीवनी ; स्थानिक नेतृत्वाला मिळणार बळकटी
तुमसर : तुमसर पंचायत समितीचे माजी सभापती नंदू राहांगडाले यांनी आपल्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे तुमसर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेला मोठी बळकटी मिळणार असून, स्थानिक पातळीवर पक्षाला नवी ऊर्जा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
नंदू राहांगडाले यांच्या प्रवेशाचे पक्षाने मनःपूर्वक स्वागत केले आहे. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देत, पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या अनुभवाचा आणि स्थानिक नेतृत्वाचा फायदा पक्षाला निश्चितच मिळेल, असे म्हटले आहे.
या प्रवेश सोहळ्यावेळी खासदार प्रफुल पटेल, आमदार राजू कारेमोरे, तुमसर विधानसभा अध्यक्ष देवचंद ठाकरे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष यासीन छवारे यांच्यासह पक्षाचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



