
अहेरी : तालुक्यातील खमणचेरू ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कनेपल्ली या गावातील रोजा नरेश बोमन ही गेल्या अनेक दिवसांपासून आजाराने ग्रस्त आहे. तीला चंद्रपूर येथील चांगल्या खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने अनेक अडचणी होत आहेत.
ही बाब स्थानिक कार्यकर्त्यांनी अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना सांगितली. त्यावेळी आत्राम यांनी बोमन कुटूंबातील सदस्यांना बोलावून त्यांची आस्थेने विचारपूस करून आजारग्रस्त मुलीच्या पुढील उपचारासाठी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली. यावेळी बोमन कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.



