गडचिरोलीविदर्भ

एटापल्ली येथे भाजपच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते झाले लोकार्पण

एटापल्ली : भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी एटापल्ली येथे भाजपच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या शुभहस्ते या कार्यालयाचे लोकार्पण अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

या नवीन जनसंपर्क कार्यालयामुळे एटापल्ली तालुक्यातील नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. उद्घाटनप्रसंगी बोलताना राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी विश्वास व्यक्त केला की, “नव्या कार्यालयामुळे संघटनेची ताकद वाढणार असून, जनसेवेची गती अधिक वेगवान होईल. शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरेल.”

या सोहळ्याला युवानेते अवधेशराव बाबा आत्राम, नगराध्यक्षा रेखा मोहूर्ले, तालुका अध्यक्ष प्रसाद पुल्लूरवार, प्रशांत आत्राम (उपसरपंच, तोडसा), मोहन नामेवार, राकेश हिरा, तिरुपती चापले, आविष्कार गड्डमवार, सुरेखाताई अडगोपुलवार, निर्मलाताई कोडबतुनवार तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यालयाच्या उद्घाटनानंतर कार्यकर्त्यांनी परिसरात एकच जल्लोष केला. आगामी काळात या कार्यालयाचा उपयोग पक्ष वाढीसाठी आणि जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रभावीपणे केला जाईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button