गडचिरोलीविदर्भ

सुंदरनगर-गोमणी जिल्हा परिषद क्षेत्रात डॉ. लुबना हकीम यांची उमेदवारी चर्चेत

युवा नेतृत्वाचा चेहरा म्हणून ओळख ; जनतेच्या मनात ‘भावी जिल्हा परिषद अध्यक्ष’ म्हणून नाव घेण्यास सुरुवात

मुलचेरा : जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी जसजशी वाढत आहे, तसतसे अनेक मतदारसंघात नव्या चेहऱ्यांची चर्चा सुरू झाली आहे. मुलचेरा येथील सुंदरनगर-गोमणी जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे युवा नेते तथा अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम यांच्या पत्नी डॉ. लुबना हकीम यांची उमेदवारी जोरदार चर्चेत आली आहे.

डॉ. हकीम या शिक्षण महर्षी स्वर्गीय बब्बूजी हकीम आणि ज्येष्ठ समाजसेविका चाचम्मा हकीम यांची नात आहेत. आपल्या आजोबा-आजींनी सुरू केलेला सामाजिक कार्याचा वसा त्या समर्थपणे पुढे नेत आहेत. त्यांच्या सकारात्मक कार्यामुळे मतदारसंघातील नागरिकांनी त्यांना ‘भावी जिल्हा परिषद अध्यक्ष’ म्हणून पाहण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक पातळीवर त्यांनी आरोग्य शिबिरांचे आयोजन, महिलांसाठी स्वावलंबन उपक्रम तसेच शिक्षण व स्वच्छता क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे. यामुळे जनमानसात त्यांची सकारात्मक छाप निर्माण झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक बैठकांमध्ये त्यांना नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून, अनेक युवक आणि महिला वर्गाने त्यांना खुले पाठबळ जाहीर केले आहे.

राजकीय वर्तुळातही डॉ. लुबना हकीम यांच्या उमेदवारीला गंभीरपणे घेतले जात आहे. स्थानिक पातळीवर एक नवा आणि सक्षम पर्याय म्हणून त्यांचे नाव पुढे येत आहे. आगामी काळात त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली, तर सुंदरनगर-गोमणी जिल्हा परिषद क्षेत्रातील ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरू शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button