गडचिरोलीमहाराष्ट्रमुंबईविदर्भ
जिल्हा क्रीडा स्टेडियमच्या बांधकामातील वनविभागाचे अतिक्रमण हटवा – आ. डॉ. देवराव होळी यांची मागणी
दुसऱ्या टप्प्यातील अंदाजपत्रकाला तत्काळ मंजूरी द्यावी

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा स्टेडियमचे बांधकाम अतिशय संथ गतीने सुरू असून या बांधकामांतर्गत क्रिडा विभागाला उपवनसंरक्षक यांच्या कार्यालयाजवळील जागा झालेली आहे. मात्र वन विभागाने अजूनही आपले अतिक्रमण काढलेले नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या जागेतील अतिक्रमण तात्काळ काढावे अशी मागणी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विधानसभेत केली.
यावेळी त्यांनी पहिल्या टप्प्यात मंजूर झालेल्या ट्रॅकला रद्द करून दुसऱ्या टप्प्यात घेण्यात यावे व दुसऱ्या टप्प्यातील अंदाजपत्रकाला तातडीने मंजूरी द्यावी अशीही विनंती सरकारला या माध्यमातून केली.



