नागपूरविदर्भ

‘पेसो’च्या उपनियंत्रकाची सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

नागपूर : ‘पेसो’ (पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह ऑर्गनायझेशन) मध्ये असलेल्या सेफ्टी कार्यरत उपनियंत्रकाने कार्यालयाच्या इमारतीतील सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून आत्महत्येमागचे कारण शोधण्याबाबत तपास सुरू आहे. निशांत मृदूल (४५) असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. ते पेसोमध्ये कार्यरत होते. ६ ऑगस्ट रोजी ते सकाळी नऊ वाजता कार्यालयात आले. त्यानंतर ते पाचव्या माळ्यावरून सातव्या माळ्यावर गेले. तेथून ते गच्चीवर पोहोचले. थोडा वेळ येरझारा घालून ते दोन ते तीन वेळा खाली आले व परत वर गेले.

यावेळी कॉम्प्लेक्समधील सीजीओ सुरक्षारक्षकाने त्यांना पाहिलेदेखील होते. काही वेळाने मृदूल परत गच्चीवर गेले व एका बादलीवर ते उभे झाले. त्यानंतर त्यांनी थेट खालीच उडी घेतली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृदूल यांनी कुठलीही सुसाइड नोट लिहिली नव्हती. पोलिसांनी कार्यालयातील त्यांच्या ड्रॉवरचीदेखील तपासणी केली. मात्र त्यातदेखील काहीही सापडले नाही. मृदूल यांनी उडी मारण्याअगोदर त्यांचा मोबाइल गच्चीच्या कठड्यावर ठेवला होता.पोलिस त्याचीदेखील तपासणी करत आहेत.  मागील काही काळापासून मृदूल है तणावात होते. कामाचा ताणदेखील वाढला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button