गडचिरोलीविदर्भ

५ ऑगस्ट रोजी गोंडवाना विद्यापीठात ‘राष्ट्रीय उच्च शिक्षण पात्रता रूपरेषा’ विषयावर शिक्षक विकास कार्यक्रम

नवी दिल्ली आणि रामटेक येथील कुलगुरूंचे मार्गदर्शन लाभणार

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान (PM-USHA) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय उच्च शिक्षण पात्रता रूपरेषा’ (National Higher Education Qualifications Framework – NHEQF) या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय शिक्षक विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता विद्यापीठाच्या सभागृहात होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे असतील. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून नवी दिल्लीच्या सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी आणि रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच, गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कवळे आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांचीही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असणार आहे.

हा कार्यक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांशी (NEP) संबंधित असून, उच्च शिक्षणाच्या नवीन वाटचालीबद्दल सखोल मार्गदर्शन करेल. या कार्यक्रमामुळे सर्व शिक्षक आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना मोठा फायदा होणार आहे. कार्यक्रमाचे संयोजन पीएम-उषा (PM-USHA) चे सॉफ्ट कॉम्पोनंट समन्वयक डॉ. प्रशांत ठाकरे यांनी केले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी सर्व प्राध्यापक आणि अभ्यासकांना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button