गडचिरोलीविदर्भ

संत श्री संताजी जगनाडे महाराजांचे विचार आणि साहित्य सर्व समाजांसाठी प्रेरणादायी – डॉ. प्रा. अभय लाकडे

कनेरी येथे संताजी जगनाडे महाराजांची जयंती उत्साहात साजरी

गडचिरोली : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत श्री संताजी जगनाडे महाराजांचे विचार आणि साहित्य सर्व समाजांसाठी प्रेरणादायी आहे. संतांनी सातत्याने नागरिकांना सामाजिक बंधुता आणि एकतेचा संदेश दिला आहे. सध्याच्या अनुचित घटना लक्षात घेता संतांचे विचार समाजासाठी आवश्यक आहेत, असे प्रतिपादन डॉ. प्रा. अभय लाकडे यांनी केले.

८ डिसेंबर रोजी, संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती कनेरी गावात तेली समाज संघटनेच्यावतीने संघटनेचे अध्यक्ष भास्कर लाकडे यांच्या प्रांगणात साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक प्रभाकर लाकडे, माजी सरपंच श्यामराव कोलते, तुळशीदास करकाडे, डंबाजी ठाकरे, घनश्याम कोलते, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मारोती लाकडे, चरणदास कोलते, हिराजी करकाडे, ईश्वर मुळे, रघुनाथ सहारे, प्रफुल्ल मुळे, घनश्याम मुले आदी मान्यवर उपस्थित होते. व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांनी संत श्री संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांनी योग्य मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन लोमेश कोलते यांनी केले. यावेळी तेली समाज संघटनेचे अध्यक्ष भास्कर लकडे, उपाध्यक्ष चुडाराम कोलते, सचिव दुर्योधन तरारे, सहसचिव बाळकृष्ण समर्थ, रवींद्र निकुरे, तुळशीदास तरारे, गौरव कोलते, कृष्णा निकुरे, अमोल करकाडे, प्रणाल कोलते, घनश्याम तरारे, उध्दव तरारे, हिरामण गंडाटे, नितिन करकाडे, एकनाथ करकाडे, प्रभाकर करकाडे, आबाजी मुले, डोमाजी गंडाटे, दिवाकर कावले, आकाश कावले व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button