गडचिरोलीविदर्भ

निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता पक्षाची खरी ताकद – आ. डॉ. मिलिंद नरोटे

गडचिरोली शहर भाजप विस्तारित कार्यकारिणीची बैठक; नवनियुक्त कार्यकर्त्यांचा सत्कार

गडचिरोली : “पक्षाच्या विचारधारेसाठी निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता हीच भारतीय जनता पक्षाची खरी ताकद आहे,” असे प्रतिपादन गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी केले. गडचिरोली शहर भाजपच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी नवनियुक्त कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. नरोटे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष आहे. कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास झपाट्याने होत असून, हा विकासाचा रथ प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

शहर अध्यक्ष अनिल कुनघाडकर यांनी प्रास्ताविक भाषणात कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आगामी नगरपरिषद निवडणुकीत विजय मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला. या बैठकीत ‘हर घर तिरंगा’ आणि रक्षाबंधन यांसारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांचे नियोजन, कार्यविभागणी आणि अंमलबजावणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, जिल्हा महामंत्री गीता हिंगे, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, चंदा कोडवते, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर येनगंदलवार, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button