गडचिरोलीविदर्भ

व्यसन सोडा, आरोग्याचा मार्ग धरा – तहसीलदार हेमंत गांगुर्डे

तोडसा येथे ५ इलाक्यांमधील १४५ गावांची भव्य महाग्रामसभा

गडचिरोली : आदिवासी समाजाने “आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी दारू आणि तंबाखूचे सेवन पूर्णपणे बंद करणे आवश्यक आहे. आपल्या काही प्रथा किंवा परंपरा आरोग्यासाठी घातक ठरत असतील, ते थांबविले पाहिजे. आपल्या ज्या आदिवासी बांधवांनी प्रगती केली आहे त्यांची प्रेरणा घेऊन आपण आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारली पाहिजे.” व्यसनमुक्त समाजच प्रगती करू शकतो, असा संदेश तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांनी दिला.

एटापल्ली तालुक्यातील तोडसा येथे नुकतीच ५ इलाक्यांमधील १४५ गावांची भव्य महाग्रामसभा पार पडली. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद कोतूराम पोटावी यांनी भूषविले, तर गाव पाटील भूमय्या पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेचे कामकाज पार पडले. जारावंडी, रोपी, वेणासार, कसनसूर, तोडसा आणि सुरजागड या भागांतील गाव पाटील, ग्रामसभा अध्यक्ष, सचिव आणि पुजारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात इतर मान्यवरांनीही विविध शासकीय योजनांची माहिती दिली. किशोर मलेवार मुक्तीपथ तालुका संघटक यांनी पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून आपले गाव दारू व तंबाखूमुक्त करण्याचे आवाहन केले. डॉ. भूषण चौधरी (तालुका आरोग्य अधिकारी) यांनी माता मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी गरोदर मातांची प्रसूती ही आरोग्य केंद्रातच (संस्थात्मक प्रसूती) होईल, यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. व्ही. एस. बुरीवार (CDPO) यांनी अंगणवाडी स्तरावर राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित पालकांना केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button