गडचिरोलीविदर्भ

‘मत मिळण्यासाठी दारू वाटू नये, दारूबंदी मजबूत करावी’ ; ४२४ गावात ठराव पारित

गडचिरोली : विधानसभा निवडणूक दारूमुक्त व्हावी, यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील ४२४ गावातील मुक्तिपथ-शक्तिपथ गावसंघटना व गावातील लोकांनी दारूमुक्त व शांततेत निवडणूक झाली पाहिजे. उमेदवाराने दारू वाटू नये, जिल्ह्याच्या दारूबंदीला समर्थन द्यावे, निवडणूक आले किंवा नाही आले तरी जिल्ह्याची दारूबंदी अधिक प्रभावी करावी, यासाठी ठराव पारित केले. मुक्तिपथ-शक्तिपथ संघटनेच्या वतीने हा उपक्रम तिन्ही विधानसभा क्षेत्रात करणे सुरू आहे.

मुक्तिपथ व गाव संघटनेच्या माध्यमातून ४२४ गावांमध्ये ग्रामस्थांना दारूमुक्त निवडणुकीची संकल्पना पटवून देण्यात आली. पूर्ण शुद्धीत राहून मतदान करता येते, योग्य उमेदवार निवडता येते. गावाची दारूबंदी टिकून राहते, मजबूत होते. मतदानाच्या काळात भांडणे शक्यतो होत नाही. शांततेच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडते. विकासासाठी निवडून दिलेल्या उमेदवाराला जाब विचारता येतो. हे दारूमुक्त निवडणुकीचे फायदे लोकांना पटवून देण्यात आले. जिल्हाभरात दारूमुक्त निवडणुकीचे आवाहन करणारे बॅनर व पोस्टर लावून जागृती केली जात आहे.

निवडणुकीसाठी उभा राहणारा उमेदवार गाव व जिल्हा दारूबंदीचा समर्थन करणारा असावा. स्वतः दारू पिणारा नसावा, निवडणुकीच्या पूर्व काळात व निवडणुकीच्या दिवशी दारू वाटप न झाल्यास निवडणूक शांततेत पार पडणार, जो दारू वाटप करेल त्याला आम्ही मत देणार नाही. दारूच्या नशेत मतदान करून अयोग्य उमेदवार निवडला जाऊ नये याची काळजी घ्यावी असेही आवाहन करण्यात आले. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी सुद्धा दारूबंदीचे समर्थन करीत मतांसाठी दारू वाटप करणार नाही, असा संकल्प केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button