
वडसा येथे भाजपा सदस्यता अभियान कार्यक्रम ; माजी आ. डॉ. देवराव होळी यांची उपस्थिती
देसाईगंज : देशाला आत्मनिर्भर व विकसित राष्ट्र बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात तर राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार असून त्या दिशेने दोन्ही नेतृत्व सातत्याने प्रयत्नरत आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे योगदान मोठे आहे. त्यामुळे जगात सर्वाधिक सदस्य असलेल्या भाजपाचे आपणही सदस्य बनून विकासाच्या प्रवाहामध्ये सामील व्हावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी वडसा येथे भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता अभियानाप्रसंगी उपस्थित मुस्लिम बांधवांना केले.
यावेळी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष इद्रिस मुलतानी, प्रदेश महामंत्री जुनेद खान, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आ. कृष्णा गजबे, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलू हुसेनी, जिल्हा महामंत्री जलाल सय्यद, एजाज शेख, शरिक शेख, अल्पसंख्याक आघाडीचे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



