
भंडारा : जिल्हा रुग्णालय भंडारा येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वयोगटातील अंगणवाडीतील बालकांची व शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत तपासणी पथकामार्फत करण्यात येते. आरोग्य तपासणीत भंडारा जिल्ह्यामध्ये एकुण 132 संशयीत हृदय शस्त्रक्रियेचे रुग्ण आढळून आलेले आहे. त्याअनुषंगाने सदर संशयित हृदयरुग्णांचे 2 डी ईको तपासणी शिबिर 06 सप्टेंबर ला जिल्हा रुग्णालय भंडारा येथे घेण्यात आले, सदर शिबिरामध्ये 70 संशयित हृदयरुग्णांचे 2 डी ईको काढण्यात आले. त्यामध्ये 21 हृदयरुग्णांना शस्त्रक्रियेकरीता संदर्भित करण्यात आले.
सदर हृदयरुग्णांमधून 13 सप्टेंबर ला आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय सावंगी मेघे, जिल्हा वर्धा येथे 15 हृदयरुग्ण लाभार्थ्यांच्या वाहनाला हिरवी झंडी दाखवून डॉ. दिपचंद सोयाम जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय भंडारा यांनी शस्त्रक्रियेकरीता रवाना केले. यावेळी प्रभारी अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विरेंद्र कुकडे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.सं) डॉ. मधुकर कुंभरे, कार्यक्रम पर्यवेक्षक (राबास्वाका) केवलचंद सिलेकर व सर्व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम व जिल्हा शिर्घ हस्तक्षेप केंद्र (डीईआयसी) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



