
जिल्ह्याला राज्य शासनाने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करावे – प्रणय खुणे
धानोरा : गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यात अनेक निसर्गरम्य ठिकाणी प्राचीन मंदिरे आहेत. परंतु राज्य व केंद्र सरकारच्या जिल्ह्यातील पर्यटन स्थळाकडे दुर्लक्षितपणामुळे सदर मंदिरे धुळखात पडलेले आहेत. सदर मंदिराच्या भग्न व जीर्णवस्थेमुळे या ठिकाणी पर्यटक येत नाही, त्याचप्रमाणे राज्य केंद्र सरकारकडून येथे कोणतीही सोयीसुविधा करण्यात आलेल्या नाही. विशेष बाब म्हणून जिल्ह्यातील प्राचीन मंदिरांना राज्य सरकारने (क) वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा द्यावा व धानोरा पासून पाच-सहा किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य भवरागड पर्यटनस्थळ आहे, या ठिकाणी अगदी जवळूनच नदी वाहत असल्यामुळे भवरागड मंदिरास एक वरदान प्राप्त झाले आहे. परंतु या मंदिराच्या उपेक्षितपणामुळे जिल्ह्यातील व राज्यातील पर्यटक या ठिकाणी येत नाही हा स्थळ केंद्र, राज्य सरकारने लक्ष देऊन विकास केला तर या ठिकाणी खूप मोठा रोजगार निर्माण होऊ शकतो व गावातील सर्वसामान्य गोरगरीब युवक नागरिक यांना सुद्धा रोजगाराचे चांगले दालन उघडे होऊ शकते. आज या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी सदिच्छा भेट देऊन पर्यटन स्थळाची पाहणी केली व येथील नागरिकांसोबत सुद्धा प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी येथील नागरिकांनी या पर्यटन स्थळाचा विकास करण्याची मागणी केली.
जिल्ह्यातील विविध तालुक्यात अशा प्रकारचे निसर्गरम्य ठिकाणी अनेक मंदिरे आहेत. परंतु राज्य सरकारने व केंद्र सरकारने येथील पर्यटन स्थळाच्या विकासाकडे लक्ष दिले नाही व स्वातंत्र्याचे इतक्या वर्षापासून आजही सदर अनेक मंदिरे व या ठिकाणी असलेली गावे विकासाची वाट बघत आहेत व प्रामुख्याने ज्याप्रमाणे देशांमध्ये गोवा हा राज्य पर्यटन राज्य आहे. त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्हा सुद्धा राज्य सरकारने व केंद्र सरकारने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करावे, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी केली आहे. यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, मानवाधिकार संघटना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनिषा मडावी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



