गोंदियाविदर्भ

जिल्ह्यातील पाच आयुर्वेदिक दवाखान्यांना ‘एनएबीएच’चे प्रमाणपत्र

गोंदिया : जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाकडे असलेल्या जिल्ह्यातील पाच आयुर्वेदिक दवाखान्यांना ‘एनएबीएच’चे प्रमाणपत्र मिळाले आहे. या कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी आरोग्य विभागाच्या टिमचे अभिनंदन केले आहे.

जिल्हास्तरावरील जिल्हा परिषद सभागृहातील स्व.वसंतराव नाईक सभागृहात जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधुन पाचही आयुष्मान आरोग्य मंदिर आयुष दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी यांना एनएबीएचचे नामांकन प्रमाणपत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी देवुन सन्मानित केले. कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती योपेंद्रसिंग टेंभरे, जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य समितीचे सदस्य छाया नागपुरे व प्रविण पटले, जिल्हा परिषद सदस्य नंदेश्वर यां सह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिष मोहबे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरजंन अग्रवाल, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे, जिल्हा आयुष समन्वयक डॉ. मिना वट्टी उपस्थित होते.

जिल्ह्यातील एकूण सात आयुष दवाखाने यांची निवड झाली होती. त्यापैकी पाच आयुष दवाखाने यांना एन.ए.बी.एच.चे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यात आयुष दवाखाना डोंगरगाव, शिवनी, गांधीटोला, अर्जुनी व सरांडी यांचा समावेश आहे. या आयुर्वेदिक दवाखान्यांमध्ये आयुर्वेदिक औषधी आणि योगासंबंधी गुणवत्तापूर्वक सेवा रुग्णांना दिली जाते तसेच मोफत आयुर्वेदिक औषध उपचारबरोबर विद्धकर्म ,अग्नीकर्म, नस्य, नाडी, स्नेहन-स्वेदन, मसाज, कपिंग अशा विविध सुविधा दिल्या जात आहे. तसेच नियमित तज्ञ योग प्रशिक्षकामार्फत योग सत्राचे आयोजन केले जात आहे.

एन.ए.बी.एच.ची मान्यता हे भारतीय आरोग्य सेवा क्षेत्रातील गुणवत्ता आणि सुरक्षिततेचे वैशिष्ट्य आहे, जे कठोर मानकांचे आणि सर्वोत्तम पद्धतींचे पालन दर्शवते. रुग्णांची काळजी वाढवण्यात, ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारण्यात आणि रुग्ण आणि भागधारकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात ती महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स, ज्याचे संक्षिप्त रूप NABH म्हणून ओळखले जाते, हे क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) चे एक घटक मंडळ आहे, ज्याची स्थापना आरोग्य सेवा संस्थांसाठी मान्यता कार्यक्रम स्थापन आणि ऑपरेट करण्यासाठी केली गेली आहे. 2005 मध्ये स्थापन करण्यात आलेले, हे भारतातील रुग्णालयांसाठी मुख्य मान्यता आहे.एन.ए.बी.एच.ही मान्यता ज्या उच्च दर्जाची काळजी आणि रुग्णांच्या सुरक्षेतेमध्ये हमी, रुग्णांच्या हक्कांचा आदर आणि संरक्षण केले जाते.

सदर एन.ए.बी.एच.मान्यता मिळण्यासाठी आयुष दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता भोयर, डॉ. शिवकुमार हरीणखेडे, डॉ. सुजाता मरापे, डॉ. किरण सोमानी, डॉ. प्रेमकुमार बघेले यांनी परिश्रम घेतले. याकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे व जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मीना वटी यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button