गडचिरोलीविदर्भ

अवैध दारूविक्री बंद करा अन्यथा गुन्हा दाखल करू

आरेवाडा येथे एसडीपीओच्या उपस्थितीत बैठक

गडचिरोली : अतिदुर्गम तालुका म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथे सुरु असलेली अवैध दारूविक्री थांबविण्यासाठी मुक्तिपथ व पोलिस विभागाच्या वतीने ग्रामस्थांची बैठक पार पडली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहीते यांनी उपस्थित राहून अवैध दारूविक्रीचे गावावर होणारे दुष्परिणाम विशद केले. सोबतच अवैध दारूविक्री तत्काळ थांबवा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले.

आरेवाडा गावात बहुतांश घरी अवैध दारूविक्री गाळली जाऊन विक्री होत असल्याने व्यसनाचे प्रमाण अधिक आहे. येथील अवैध दारूविक्रेत्यांच्या माध्यमातून भामरागड शहरातील विक्रेत्यांसह परिसरातील किरकोळ दारूविक्रेत्यांना अवैध दारूचा पुरवठा केला जातो. या गावातील नागरिकांना अवैध दारूविक्री विरोधात जागृत करण्यासाठी मुक्तीपथ तर्फे विविध उपक्रम घेण्यात आले. नुकतेच पोलिस उपविभागीय अधिकारी अमर मोहिते, पोलिस निरीक्षक दीपक डोंब व मुक्तिपथ तालुका संघटिका निळा किन्नाके यांच्या उपस्थितीत गावातील मुख्य चौकात ग्रामस्थांची बैठक पार पडली. यात पोलीस अधिकारी यांनी दारूबंदीच्या कायद्याबाबत माहिती देत दारूविक्री करू नका अन्यथा पोलीस विभागाच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आवाहन केले. मुक्तिपथ तालुका संघटिका निळा किन्नाके यांनी दारूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी व्यसन उपचार शिबिराची माहिती देत उपचार घेण्याचे आवाहन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनंदा लटारे, स्पार्क कार्यकर्ता सुरेश आसाम उपस्थित होते.

सभेदरम्यान गावात बदल घडण्यासाठी व्यसनाचे प्रमाण कमी होणे गरजेचे आहे. यासाठी व्यसन उपचाराची गरज असल्याची बाब ग्रामस्थांना पटवून देण्यात आली. त्यानंतर गावात व्यसन उपचार शिबीर घेण्याचा ठराव पारित करण्यात आला. यावेळी तालुका उपसंटक भुपेंद्र सडमेक, स्पार्क विद्यार्थी कार्यकर्ता सुरेश आसाम यांनी केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जितेंद्र मडावी संघटना अध्यक्ष, सुनंदा लटारे ग्रापं सदस्य, विमलताई, दिपक मडावी,रोहीत सडमेक यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button