गडचिरोलीविदर्भ

भाजपा संघटनबळासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांची गरज – माजी खा. डॉ. नेते

गडचिरोली : भाजप हा केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर तो एक कुटुंब आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने ‘माझा पक्ष, माझी जबाबदारी’ या भावनेने कार्य करणे गरजेचे आहे. पक्षवाढीच्या प्रक्रियेत कार्यकर्त्यांनी निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पण ठेवले पाहिजे. कार्यकर्त्याने पक्षाच्या ध्येयधोरणांची नीट समज ठेवून, पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना न्याय देत, वेळ देणारे आणि निष्ठेने काम करणारे असावे. संघटनात्मक बळकटीसाठी अशा कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गरज असल्याचे प्रतिपादन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी केले.

भारतीय जनता पार्टी धानोरा तालुक्याच्या आढावा बैठकीचे आयोजन धानोरा येथील शासकीय विश्रामगृहात पार पडले. या बैठकीत कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधणीबाबत मोलाचे मार्गदर्शन ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, तालुका अध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत सांगितले की, सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मत जाणून घेत अहवाल प्रदेश पातळीपर्यंत पोहोचवण्यात येईल. त्यामुळे कोणताही गैरसमज किंवा गोंधळ न होता शांतता राखावी आणि संघटनेच्या हितासाठी सामंजस्यपूर्ण वातावरण ठेवावे.

बैठकीस आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री तथा निवडणूक प्रमुख प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा निवडणूक प्रमुख अनिल पोहनकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा कृ.उ.बा.स. सभापती शशिकांत साळवे, तालुकाध्यक्षा लता पुंघाटे, आदिवासी मिडिया सेल प्रमुख अक्षय उईके, तालुका महामंत्री विजय कुमरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button