आरोग्यगडचिरोलीविदर्भ

११ ते २४ जुलैपर्यंत लोकसंख्या दिन पंधरवडा : आरोग्य विभागातर्फे जनजागृती

गडचिरोली : वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्यावर आळा घालण्याकरिता आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात ११ ते २४ जुलैपर्यंत जि.प. सीईओ आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक लोकसंख्या दिन पंधरवडा राबविण्यात येत आहे. ‘कुटुंबनियोजन, जबाबदारी प्रत्येक दाम्पत्याची’ हे यावर्षीचे घोषवाक्य आहे.

जि. प. सीईओ आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक लोकसंख्या दिन पंधरवडा राबविण्यात येणार आहे. जिल्हा महिला व बाल रुग्णालयात जिल्हास्तरीय जागतिक लोकसंख्या दिन पंधरवडा कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय उद्घाटन १५ जुलै रोजी करण्यात आले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. शिंदे यांनी आशा व आरोग्य सेविकांमार्फत लोकसंख्यावाढीबाबतचे दुष्परिणाम समजावून सांगत जास्तीत जास्त लोकांना कुटुंबनियोजन साधनांचा वापर करण्यास प्रवृत्त करण्याविषयी जनजागृती करावी यावर विशेष भर द्यावा, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. प्रफुल्ल हुलके यांनी केले. दोन अपत्यांमध्ये तीन वर्षांचे अंतर ठेवावे तसेच प्रसूतीच्या खेपेतसुध्दा सुरक्षित अंतर गरजेचे आहे. लोकसंख्यावाढ रोखण्यासाठी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया, तात्पुरत्या पद्धतीच्या साधनांचा अवलंब करावा, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. महिला व बाल रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत आखाडे यांनीही मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ. अमित साळवे, डॉ. बागराज धुर्व, डॉ. मसराम डॉ. पंकज हेमके, डॉ. गोरे, व डॉ. नन्नावरे, श्रीमती पोतराजवार आदी उपस्थित होते. जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली, आरोग्य विभाग जिल्हा परिषद गडचिरोली येथील कर्मचारी तसेच शहर विभागातील आशा कार्यकर्त्या व लाभार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन पी. एच. रामटेके यांनी केले. आभार प्रवीण गेडाम यांनी मानले. यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button