गडचिरोलीविदर्भ

गडचिरोली जिल्ह्यातील शेतसाऱ्यास अपात्र जमिनी नियमित कराव्यात – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

गडचिरोली : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील गावठाण बाहेरील क वर्ग (शेतसाऱ्यास पात्र नसलेल्या) जमिनींची वैयक्तिक मोजणी करुन त्या जमिनी नियमित कराव्यात, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील धारणाधिकार क गावठाण जमिनींचे नोंदणीकृत विक्रीपत्र करण्याबाबत बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गावठाण बाहेर क वर्ग जमिनीचे 4615 मालमत्ता पत्रक बनविण्यात आले आहेत. यापैकी 1500 हून अधिक प्रकरणी मोजणी झालेली नसून नगररचना विभागाची परवानगी नाही. यामुळे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत 2019 साली स्थगितीचे आदेश देण्यात आले आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी मोजणी झालेल्या जमिनींवरील स्थगिती उठवून मोजणी न झालेल्या जमिनीची मोजणी करुन ती नियमित करणे, अशा दोन टप्प्यांमध्ये प्रक्रिया करावी लागेल, अशी माहिती गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

ज्या जमिनीची मोजणी झाली नाही त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वैयक्तिक मोजणी करुन घ्यावी. याच्या शुल्कापोटी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेमधून निधी उपलब्ध करुन घ्यावा आणि या जमिनी विक्रीपत्र करणे व हस्तांतरीत करण्यासाठी नियमित करुन घ्याव्यात, असे निर्देश ना.बावनकुळे यांनी यावेळी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button