
देसाईगंज : आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देसाईगंज येथे समाजवादी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वानुमते सादिक (बबलू) शेख यांची देसाईगंज-वडसा शहर अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली.
सदर बैठकीत आगामी नगरपालिका निवडणुकांसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या उमेदवारांना घरोघरी जाऊन जनतेची कामे करण्यासंदर्भात आणि ज्या प्रभागांमध्ये सोयी-सुविधा नाहीत, नाल्यांची सफाई नाही, अशा समस्यांसाठी जबाबदार असलेल्यांची जनतेसमोर ‘पोल खोल’ करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. देसाईगंज शहरातील सर्व प्रभागांमधून समाजवादी पक्षाचे उमेदवार निवडून आणण्याबद्दलही या सभेत चर्चा झाली.
या बैठकीला समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष इलियास खान, वरिष्ठ समाजवादी नेते महेबूब खान, हाजी फैझान पटेल, महिला सभा जिल्हाध्यक्ष सीमा डोंगरे, जिल्हा महासचिव जिब्राईल शेख, जिल्हा संघटक जाफर शेख, देसाईगंज तालुका अध्यक्ष डोमाजी दिवटे, ज्येष्ठ समाजवादी पदाधिकारी हाजरा शेख, सुनीता नैताम, जावेद खान, उपाध्यक्ष मुजीब शेख, जब्बार शेख, धनराज येलतुरे, मनोज राऊत, अश्विन नेवारे, अल्पसंख्यांक विभागाचे देसाईगंज तालुका अध्यक्ष मुन्ना शेख, नवनिर्वाचित वडसा शहर अध्यक्ष सादिक शेख, अल्प विभाग सचिव तहेसीन खान, अल्प विभाग उपाध्यक्ष जावेद खान, नाजीम शेख, सुनीता चौधरी आदी उपस्थित होते.



