क्राईमयवतमाळविदर्भ

प्रतिबंधित सुगंधित तंबाखूसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त

बिटरगाव पोलिसांची कारवाई ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

यवतमाळ : मालवाहू तीनचाकी ऑटो ढाणकीकडे जात असताना सापळा रचून पाच लाख ४० हजार रुपये किमतीच्या सुगंधित तंबाखूसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बिटरगाव पोलिस ठाण्याच्या पथकाने शुक्रवारी रात्रीदरम्यान केली.

तौफिक खान फकीर खान (३५, रा. उमरखेड) असे ताब्यात घेतलेल्या चालकाचे नाव आहे. ऑटोमधून (क्रमांक एमएच ०३, एएच ७६३६) सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती बिटरगाव पोलिसांना मिळाली. त्यावरून सोईट ते ढाणकी रोडवर सापळा रचण्यात आला. ऑटो सोईटकडून ढाणकीकडे येत असताना त्यास थांबवून तपासणी करण्यात आली. त्यात पाच लाख ४० हजार रुपये किमतीचा सुगंधित तंबाखूच्या १८ बॉक्समध्ये ९०० पाकिटे व एक लाख ६० हजार रुपये किमतीचा ऑटो असा एकूण ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुगंधित तंबाखू पुसद येथील इम्तियाज खान अजब खान याच्याकडे नेत असल्याची कबुली तौफिक खान याने पोलिसांना दिली. बिटरगाव पोलिस ठाण्यात तौफिक खान फकीर खान (३५, रा. उमरखेड), इम्तियाज खान अजब खान (वय ३०, रा. वसंतनगर, पुसद) यांच्याविरुद्ध कलम २७३,२७४, २७५, १२३, ३(५) बीएनएस सहकलम ५९ अन्न व सुरक्षा व मानदे कायदा सन २००६ नियम व नियमने २०११ चे कलम २६(२) कलम २७, कलम ३० (२) (अ), कलम ५९ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, एसडीपीओ रजनीकांत यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संतोष मनवर, अन्नसुरक्षा अधिकारी अमित कुमार उपलप, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी टिपुर्णे, रवी गिते, देवीदास हाके, नीलेश भालेराव, बालाजी मस्के, प्रवीण जाधव आदींनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button