‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना महिलांचे सशक्तीकरण व आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने सरकारचे महत्वपूर्ण पाऊल – माजी आ. राजेंद्र जैन

गोंदिया : नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र शासनातर्फे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण’ योजना जाहीर करण्यात आली. महिलांचे आर्थिक सशक्तीकरण, स्वावलंबन व आत्मनिर्भर करण्यासाठी जुलै २०२४ पासून दर महिन्याला १५०० रु. तसेच महिलांच्या सक्षमीकरणाकरिता अनेक योजना जाहीर केल्याने गोंदिया जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार प्रफुल पटेल यांचे आभार मानले.
गोंदिया शहर व ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवन, गोंदिया येथे माजी आ. राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. पक्षाची विचारधारा व पक्ष संघटन मजबूत करणे, महिलांचे सशक्तीकरण, स्वावलंबनासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांचे कृषी वीज बिल माफ करणे, शेतकऱ्यांच्या दूध दराला प्रति लिटर ५ रु अनुदान, महिलांना पिंक इ-रिक्षाचे वाटप, मुलींना निशुल्क उच्च शिक्षण सहित महायुती सरकारचे जनहितार्थ घेतलेले अनेक निर्णय खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य करावे असे आवाहन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय, गोंदिया येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत पात्र लाभार्थी महिलांचे अर्ज भरून सहायता केंद्र सुरु करण्यात आले व दररोज लाभार्थ्यांचे अर्ज भरण्यात येणार आहे.
यावेळी बाळकृष्ण पटले, कुंदन कटारे, नानू मुदलियार, माधुरी नासरे, केतन तुरकर, मोहन पटले, रफीक खान, अखिलेश शेठ, नीरज उपवंशी, शंकरलाल टेंभरे, रवीकुमार पटले, मनोहर वालदे, शिवलाल जमरे, विनीत सहारे, राजेश जमरे, चंदन गजभिये, नितीन टेंभरे, करण टेकाम, रमेश गौतम, विजेंद्र जैन, आशा पाटील, कीर्ती पटले, रुचिता चव्हाण, शर्मिला पाल, अनिता जैतवार, पुस्तकला माने, मोनिका सोनवाने, मदन चिखलोंडे, रमेश कुरील, लिकेश चिखलोंडे, हर्षवर्धन मेश्राम, राधेश्याम पटले, टी.एम. पटले, चंद्रकुमार चुटे, एकनाथ वहिले, संजीव राय, राज शुक्ला, संजय राऊत, प्रदीप रोकडे, हितेश पतेह, पवन पटले, पन्नालाल डहारे, नागो बनसोड, अनुज जायसवाल, गोविंद लिचडे, श्रावण ठकरांनी, हरिराम आसवानी, पंकज चौधरी, योगेश पतेह, योगेश कन्सरे, अनिल खरोले, दिलीप डोंगरे, विजेंद्र बोरकर, सुरेश चुटे, प्रमोद कोसरकर, सुनिल पटले, शैलेश वासनिक, आरजू मेश्राम, कपिल बावनथडे, कान्हा बघेले, खुशाल कटरे, राहुल गजबे, डी.एम. पाटील, दर्पण वानखेडे, शरभ मिश्रा, मंगेश रंगारी, श्रेयस खोब्रागडे, कुणाल बावनथडे, रवींद्र किसने, कमलेश मेश्राम, वामन गेडाम सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



